Monday 1 February, 2010

फक्त तुझ्यासाठी

तू कुठे गेलीस सखे, मला सोडून या एकांतात |
तुजवाचून सर्व रूक्ष आहे, माझ्या जिवनाच्या वाळवंटात ||

ऐक माझ्या मनातून, तुझचं नाव येतंय |
तू नसताना माझ्या प्रेमाचं शीड, उगाच हेलकावे खातंय ||

प्रेमाच्या या समुद्रात, उसळतायत उंच उंच लाटा |
जीव घेतात गं तुझ्या या, कपाळावर सोडलेल्या बटा ||

नयन तुझे गहिरे, जणू मदनाचे बाण |
तुझ्या एका कटाक्षापायी, येतो कंठाशी प्राण ||

तुझ्या डोळ्यातील काजळ, दिसते जणू चंद्रकोर |
तुझ्या दर्शनासाठी, आसुसलेला गं मी चकोर ||

आसुसलेल्या धरतीची, धग शमवतो वरूणराजा |
तुला जिवनसाथी बनवून, वाजवायचाय मला बँडबाजा ||

येतेस रोज संध्याकाळी, राणीच्या बागेत फिरायला |
एकदाचा होकार दे, आणी मुक्त कर माझ्या जिवाला ||

No comments:

Post a Comment