Thursday 11 February, 2010

फक्त तुझ्यासाठी..

काल तीला भेटणार होतो...पण ऑफिसमधे काम आल्याने बाईसाहेब काही भेटायला येउ शकल्या नाहीत...बसल्या बसल्या खालील कविता सुचली..

त्या दिवशी होती सकाळ
कुंद ढगांनी भरलेली |
ओले केस घेऊन न्हालेली तू
बस साठी थांबलेली ||

वाटलं तुझ्या ओल्या केसातून
फिरावं वारा बनून |
काळजाची धकधक वाढली
तुझ्या गालावरची खळी पाहून ||

तुझ्या त्या डोळ्यांच्या समुद्रात
मारावी वाटतेय डुबकी |
काढलेल्या तुझ्या आठवणींनी
लागते का गं रोज उचकी ||

आजकाल तुझं दिसणं
झालय आमवस्या पौर्णिमा |
वेडा करतो गं तुझ्या गालावरचा
तो कातील रक्तीमा ||

तू नसलीस जवळ की
मन भटकतं माझं रानी-वनी |
विश्वास ठेव माझ्यावर
तूच बसलीय गं माझ्या मनी ||

Thursday 4 February, 2010

आठवण ...(२)

बरेच दिवस झाले तुला पाहून
तुझा सुगंध माझ्या श्वासात भरून
डोळ्यात साठवलेल्या त्या सुंदर
चेहर्‍यावर अन तुझ्या फोनवरच्या
आवाजावर समाधान मानतोय

ऑफिसच्या जिन्यावरचा तो चहा
ती शेअर केलेली कॅडबरी
बस मधे बसून ऐकलेलं 'जरा जरा'
नंतरच्या त्या फोनवरच्या गप्पा
सगळ्याची आठवण येतेय

आजही माझ्याकडे आहे
तुझा तो पहिला मेसेज
आणी पहिल्या शॉपिंगचा शर्ट
आज तोच शर्ट घालून
ऑफिसला जावे म्हणतोय

Monday 1 February, 2010

फक्त तुझ्यासाठी

तू कुठे गेलीस सखे, मला सोडून या एकांतात |
तुजवाचून सर्व रूक्ष आहे, माझ्या जिवनाच्या वाळवंटात ||

ऐक माझ्या मनातून, तुझचं नाव येतंय |
तू नसताना माझ्या प्रेमाचं शीड, उगाच हेलकावे खातंय ||

प्रेमाच्या या समुद्रात, उसळतायत उंच उंच लाटा |
जीव घेतात गं तुझ्या या, कपाळावर सोडलेल्या बटा ||

नयन तुझे गहिरे, जणू मदनाचे बाण |
तुझ्या एका कटाक्षापायी, येतो कंठाशी प्राण ||

तुझ्या डोळ्यातील काजळ, दिसते जणू चंद्रकोर |
तुझ्या दर्शनासाठी, आसुसलेला गं मी चकोर ||

आसुसलेल्या धरतीची, धग शमवतो वरूणराजा |
तुला जिवनसाथी बनवून, वाजवायचाय मला बँडबाजा ||

येतेस रोज संध्याकाळी, राणीच्या बागेत फिरायला |
एकदाचा होकार दे, आणी मुक्त कर माझ्या जिवाला ||