Tuesday, 1 December 2009

मी आणी पाउस

दिवस होता अंधारलेला आणी रात्रही उजाडलेली
झाडे होती उघडी बोडकी , किंचीत पानेही गळलेली

अशाच काही क्षणी येते आठवण तुझी
माझ्या हळव्या मनी खोल साठवलेली

मनास धुंद करून जातो तुझा एकच स्पर्श
नभासही सार्‍या होतो निमिषात एक कुंदसा हर्ष

अशाच एका पावसातील ती पहिली भेट आपली
तुला न्याहाळणारा मी आणी तू चिंब भिजलेली

त्याक्षणी खुललं माझ्या मनाच्या बँकेत
तुझ्या नावाचं एक रिकरींग खातं

तेंव्हापासून माझं आणी पावसाचं
आहे वेगळं असं एक नातं

No comments:

Post a Comment