पुर्वेतिहास :
दि. २१.०८.२००९ . श्रावण कालच संपलेला....विकांताचा बेत असा ठरलेला की राजेंच्या राजधानीस भेट द्यावी. थोडक्यात ठरलेला बेत असा....भाड्याने रथ (पक्षी चारचाकी) घेउन सकाळ सकाळ (पहाटेचे ५.३०) राजेंच्या राजधानी साठी कूच करायचे. राजेंचे दर्शन घेउन संध्याकाळी घरी परत.
पुर्वेतिहास समाप्त
दि. २२.०८.२००९
पहाटेचे ५.३०
अस्मादिक आणी अस्मदिकांचे सहवासी घोरत...
पहाटेचे ६.३०
अस्मादिक आणी अस्मदिकांचे सहवासी घोरत...
पहाटेचे ८.३० (आमची पहाटच हो..)
अस्मादिक आणी अस्मदिकांचे सहवासी शुचिर्भूत स्नान करून रथाच झोल न झाल्याने घोड्यांवरून रपेटीस तयार.
हे आमचे तयार घोडे (पक्षी दुचाकी)
अशा या घोड्यांवर स्वार होउन आम्ही अगेकूच चालू केली राजेंच्या राजधानी कडे..... आहो दिल्ली नाही काही आमचं जायचं ठिकाण होतं.................................... किल्ले रायगड
सकाळचे १०.००
स्थळ : श्री दत्त गुरू स्नॅक्स, पनवेल
येथे न्याहारी उरकुन रायगडी प्रस्थान केले. येथे पवसाने आमची साथ द्यायला सुरुवात केली जी घरी परत येइ पर्यन्त सोडली नाही.
सकाळचे १०.३०
रस्त्यातून दिसणारा कर्नाळा
दुपारचे १२.३०
पायथ्याहून दिसणारा रायगड....पूर्ण धुक्यात बुडालेला.. डाव्या कोपर्यामधे टकमक टोक..
दुपारचे १३.००
घोरण्यात २ तास घालवल्याने गडावर रोप वे ने जाय्चे ठरवले... हाच तो ढगात गायब होणारा रोप वे..
दुपारचे १३.०५
लगेचच गडावर पोहोचलो..त्याचीच काही क्षणचित्रे.
महाराजंचा राजवाडा
नगारखाना आणी धुके
नगारखाना आणी त्यावर तळपणारा सूर्य (दरवाज्यातून दिसणारी मेघडंबरी)
II राजेII
शिवरायांचे आठवावे रूप !!
शिवरायांचा आठवावा प्रताप!!
होळीच्या माळाजवळील एक झाड
जगदिश्वराच्या मदिराचा कळस
महाराजंच्या समाधी जवळील एक शिलालेख
शिलालेख क्र. २
धुक्यात बुडालेला सह्याद्री
सूर्यदर्शन
निवेदन : रायगडाविशयी सर्वांना माहिती असल्याने जास्त महिती दिली नहिये. शिलालेखांचे अर्थ कोणाला माहित असल्यास क्रुपया प्रकाश टाकावा.माझ्या माहिती प्रमाणे ते मोडी लिपीत आहेत.
No comments:
Post a Comment